प्रसिद्ध चित्रकार सुभाष शेगोकार यांचे ‘भटकंती’ हे चित्रप्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन 22 सप्टेंबर दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत पाहता येईल. यामध्ये अॅक्रॅलिक, जलरंग माध्यमातील चित्रे आहेत.
सुभाष शेगोकार गेली 25 वर्षे आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वास्तववादी, निसर्गाच्या सान्निध्यातील कलाकृती असे सुभाष शेगोकार यांच्या शैलीचे वर्णन करता येईल. अंबरनाथ येथे राहणारे सुभाष शेगोकार अनेक ठिकाणी भटपंती करून तिथे चित्रे काढतात.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणांना सुभाष शेगोकार भेट देतात ती ठिकाणे, तिथले वातावरण चित्रांच्या माध्यमातून कलारसिकांपर्यंत पोचवतात. ‘भटकंती’ प्रदर्शनात अंबरनाथ, रत्नागिरी, शहापूरचे आदिवासी पाडे, वाराणसी, राजस्थान अशा अनेक ठिकाणची चित्रे आहेत. प्रदर्शन निःशुल्क आहे.