Exclusive: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो जारी, पाहा फोटो

saif ali khan stab

अभिनेता सैफ अली खानवर वार करणाऱ्या आरोपीची ओळख पटल्याची मोठी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या आरोपीचा फोटो जारी करण्यात आला आहे. हा फोटो सीसीटीव्ही फुटेजमधून घेण्यात आला आहे. हल्लेखोराला सीसीटीव्ही असल्याचं लक्षात आलं तेव्हा त्याकडे बघतानाचा हा फोटो आहे, असं सांगण्यात येत आहे.

saif ali khan stab

या प्रकरणी झोन 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना माहिती दिली. अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री जो हल्ला झाला या प्रकरणी पोलिसांची 10 वेगवेगळी पथकं तपास करत आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलीस अधिकारी गेडाम यांनी सांगितले.

आतापर्यंतच्या तपासात हा चोरीचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. आरोपीला लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर पुढील सर्व माहिती माध्यमांना दिली जाईल, असे गेडाम म्हणाले.

इमारतीवरील अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्यानं आरोपीने इमारतीमध्ये प्रवेश केला. यानंतर जिन्याच्या वापर करत तो घरात घुसला होता. या आरोपीची ओळख पटली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त गेडाम यांनी दिली.