कमी किमतीत अमेरिकन डॉलर देऊ अशी बतावणी करत एका तरुणाला तिघांनी तीन लाखांचा गंडा घातल्याची घटना मुलुंड येथे घडली. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपींचा शोध सुरू केला आहे.
हाजी कासमानी (38) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून तो आखाती देशात व्यवसाय करतो. काही महिन्यांपूर्वी हाजी हिंदुस्थानात परतला होता. याचदरम्यान त्याच्या परिचयाचा आंबे विव्रेत्या तरुणाने त्याची मावशीदेखील अनेक वर्षे अमेरिकेत राहिली असून तिच्याकडे काही अमेरिकन डॉलर असल्याचे सांगितले. 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर ती केवळ तीन लाख रुपयांत देत असल्याचे राहुलने त्याला सांगितले. साठ हजारांचा फायदा होत असल्याने हाजीने ते अमेरिकन डॉलर घेण्याची तयारी दाखवली. मग ठरल्याप्रमाणे आरोपीने हाजीकडून तीन लाख रुपये घेतले व त्याला डॉलरचे बंडल देऊन पोबारा केला.