
केस धुतल्यावर सुकवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे नैसर्गिकरीत्या मिळणारे ऊन. पण प्रत्येकवेळी आपल्याला ऊन मिळेलच असे नाही, अशावेळी आपण केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करतो. तुम्ही हेअर ड्रायर नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला त्याचे तोटे आणि खबरदारी जाणून घेणे आवश्यक आहे.

केसांना नवीन हेअरस्टाइल देण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर केला जातो. पण त्याचे तोटेही लवकरच दिसू शकतात. हेअर ड्रायरच्या अतिवापराने केसांचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेतले जाऊ शकते. दुसरीकडे रोजच्या वापरामुळे केसांमध्ये कोंडा, क्लेमेंट, निस्तेज आणि कोरडेपणा यासारख्या समस्या वाढू शकतात आणि केस कोरडे आणि निर्जीव होऊन तुटायला लागतात. हेअर ड्रायर मुळे केसांच्या मुळांना इजा होते, तसेच डबल केस फुटण्यास सुरुवात होते.
हेअर ड्रायर वापरताना लक्षात ठेवा की, केसांपासून त्याचे अंतर 6-9 इंच असावे. अन्यथा, केसांमधील कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटण्यास सुरवात होतील. हेअर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना सिरम लावा, जेणेकरून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांचे जास्त नुकसान होणार नाही आणि केस मऊ होऊ शकतात. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर ड्रायर वापरणे चांगले. केस कुरळे, कोरडे, मऊ किंवा रेशमी आहेत की नाही यावर अवलंबून, आपल्याला तापमान किती लागेल हे लक्षात घ्यायला हवे.
हेअर ड्रायरच्या अतिरिक्त वापरामुळे अनेकांमध्ये केस सफेद होण्याचे प्रमाणही खूप वाढलेले आहे. अतिरिक्त वापरामुळे केसांखालील त्वचा कोरडी होते त्यामुळे केस तुटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच हेअर ड्रायरचा वापर हा डोळसपणे करायला हवा. उगाच अतिरिक्त वापर करून केसांना हानी पोहचण्यापेक्षा थोडा डोळसपणे हेअर ड्रायरचा वापर करा.