माजी आमदार आणि अजित पवार गटात सामील झालेले नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. उपचारासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सिद्दीकी यांच्यावर तिघांनी हल्ला केला असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक जण उत्तर प्रदेशचा असून दुसरा हरयाणाचा असून तिसरा आरोपी फरार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शनिवारी झीशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पुर्वेकडील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले.