लोकशाहीचा उत्सव साजरा करताना ईव्हीएमचा पुनर्विचार गरजेचा, संविधानावरील चर्चेत सुनील प्रभू यांचे आवाहन

मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव असे आपण मानतो, पण अलीकडच्या काळात ईव्हीएम मशीन्सबद्दल लोकांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. जगातील आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर देशात राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. जगातील एवढा मोठा उद्योगपती ईव्हीएम मशिन्सच्या व्यवस्थेवर संशय घेतो तेव्हा निवडणुकीत ईव्हीएम मशीन्सबाबत भविष्यकाळात विचार करणे गरजेचे आहे, असे मत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत व्यक्त केले.

संविधानावरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी संविधानाने दिलेले हक्क, आपल्या जबाबदाऱ्या याचे महत्त्व विषद केले. आपल्या संविधानाने देशाला सशक्त लोकशाही दिली आहे. पण दुसरीकडे संविधानाचे उल्लंघन, लोकशाही संस्थांवर दबाव, मानवी हक्कांचे उल्लंघन, समजातील विषमता व त्याचे विविध परिणाम अशी अनेक उदाहरणे आहेत. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. पण अलीकडच्या काळात ईव्हीएम मशीन्स ईव्हीएमबद्दल संदिग्धता लोकांच्या मनात आहे त्याचा देखील या चर्चेत विचार करणे गरजेचे आहे. प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या संकल्पनेमुळे  विज्ञान तंत्रज्ञानात अनेक मोठे बदल घडले आहेत. पण त्यांनीही ईव्हीएम हटवण्याची मागणी केली आहे. ईव्हीएम मशीन्स हॅक होण्याचा धोका अजूनही जास्ती आहे, या  त्यांच्या विधानानंतर देशात राजकीय खळबळ उडाली. कोणतीही गोष्ट हॅक होऊ  शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाद अधिकच तीव्र झाला. त्यामुळे ईव्हीएम हटवणे ही पारदर्शकेतासाठी चांगली कल्पना आहे. संविधानावर आपण चर्चा करतो, पण एवढा मोठा उद्योगपती सिस्टमवर संशय घेतो तेव्हा या सिस्टमवर विचार करणे गरजेचे आहे. संविधानावर चर्चा करताना ईव्हीएमवर भविष्यकाळात विचार करणे गरजेचे आहे, असे सुनील प्रभू म्हणाले.

एलॉन मस्क यांनी ईव्हीएम काढून टाकण्याची मागणी केली आहे. ही चर्चा भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हतेच्या मुद्दय़ावर पेंद्रित झाली. एवढा मोठा उद्योगपती सिस्टमवर संशय घेतो तेव्हा संविधानावर चर्चा करताना ईव्हीएमच्या भविष्यकाळात विचार करणे गरजेचे आहे.

सुनील प्रभू, शिवसेनेचे मुख्य प्रतोद