चित्रपटात कोंबडी दाखवली तरी 30 हजार रुपये मागतात… गळफास घेण्याची धमकी देत चित्रपट निर्माता झाडावर चढला

चित्रपटात एक कोंबडी दाखवली तर सीन पास करण्यासाठी ऑनिमल वेल्फेअर बोर्डाला तीस हजार रुपये द्यावे लागतात, असा आरोप करत ‘शिरच्छेद प्रेमाचा’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आंदोलन केले. गळफास घेण्याची धमकी देत निर्माते प्रवीणकुमार मोहारे थेट झाडावर चढले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना खाली उतरवून पोलीस स्टेशनमध्ये नेले.

ऑनिमल वेल्फेअर बोर्डाच्या जाचक अटींना वैतागलेले निर्माते प्रवीणकुमार मोहारे म्हणाले, चित्रपटात एक काsंबडी दाखवली तरी त्यासाठी 30 हजार रुपये भरा आणि सीन पास करा, अशी सतत मागणी केली जाते. ऑनिमल वेल्फेअर बोर्डाचा हा नियम असल्याचे सेन्सॉर बोर्ड सांगते. 30 हजार रुपये घेऊन ही लोक कोणता नियम बाजूला करतात? चित्रपटात बैलगाडय़ा, काsंबडय़ा आणि आपली संस्कृती दाखवली तरी त्याला ते प्राण्यांवरील अन्याय म्हणतात. मग आता आम्ही उघडी-नागडी चित्रपट बनवायची का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.