
राज्यामध्ये भाजप महायुतीचे सरकार असताना नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये चौकशी करावी, असे निवेदन भाजपाचे राज्यकार्यकरणी सदस्य भानुदास बेरड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्याला आता महिना उलटून गेला तरीही कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली असून तर्कवितर्क करण्या येत आहे. आता नव्याने 1 लाख 25 हजार 136 नळजोडणीची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करणार आहे. मात्र, योजना पूर्ण होत नसल्याने नळजोडणीची कामे रखडली आहेत.
नगर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत जी जी कामे झाले आहेत ती बोगस पद्धतीने झाली आहेत, अशा तक्रारी अनेक ग्रामस्थांनी तसेच शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आली होती. अनेकांनी जिल्हा परिषदेमध्ये आंदोलनेही केलेली होते. या सर्व बाबी लक्षात घेता या प्रकरणासंदर्भामध्ये प्रशासन गांभीर्याने घेत नाही हे पुन्हा दिसून आले होते.
भाजपाचे प्रदेश सदस्य भानुदास बेरड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाची तात्काची करावी अशी मागणी केली होती. त्याला आता महिना उलटून गेला तरीही कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या तक्रारीची दखल घेतली की नाही याबद्दलच उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. येथील जिल्हा प्रशासनामुळे यावर कोणतीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यामध्ये अनेक कामे ही बोगस पद्धतीची झालेली आहे. यासाठी अनेकांनी आंदोलन पण केलेली आहे. अजूनही जल जीवन मिशनच्या कामांमध्ये पारदर्शकता यायला तयार नाही. तर वेळ मारून देण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. काहींनी वरिष्ठ पातळीवर सुद्धा याची दखल घ्यावी म्हणून मागणी केलेली आहे. तर काहींनी जिल्हा परिषदेसमोरच आंदोलनही केले आहे. एवढे होऊनही प्रशासन दाखल घेत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीयोजनांची कामे येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेबरोबरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमोर आहे. जिल्हा परिषदेच्या 830 तर जीवन प्राधिकरणांकडील 112 पाणीयोजनांच्या माध्यमातून 1 हजार 269 गावांमधील ग्रामस्थांना नळकनेक्शन मिळणार आहे. सध्यास्थितीमध्ये 6 लाख 73 हजार 427 नळजोडणी यापूर्वीची असून आता नव्याने 1 लाख 25 हजार 136 नळजोडणीची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करणार आहे. मात्र योजना पूर्ण होत नसल्याने नळजोडणीची कामे रखडली आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेकडे 830 पाणीयोजनांची कामे असून त्यामाध्यमातून 937 गावांना शुद्ध पाणी मिळणार आहे. मात्र योजनांच्या कामांना मंजुरी देण्यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणातून काही वाड्या वस्त्यांचा समावेश राहिला. अर्थात लोकसंख्या योग्य असली तरी परिसरातील वाड्या व वस्त्यांचा समावेश न झाल्याने आता सुधारित वाढीव प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 300 वाढीव कामांचा 300 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यापैकी 116 कामांचा 80 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
अर्थात राज्य शासनाकडे वाढीव कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असले तरी ते अद्याप मंजूर झालेले नाही. या वाढीव कामांचे आवश्यक व त्यांचे पुरावे द्यावे लागत आहेत. या 300 कामांपैकी अवघे 10 टक्के कामे ही स्रोत बदलण्याची आहेत. पाण्याचा स्त्रोत नसेल तर किंवा तो सर्वेक्षणावेळी योग्य होत किंवा पाणी होते पण आता पाणी नाही. म्हणून हा स्त्रोत बदलावा लागत आहे. वस्ती व वाड्यांचा समावेश नजरचुकीने राहिल्याने आता वाढीव प्रस्ताव केला जात असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलजीवन मिशनची ओळख आहे. प्रती माणसी 50 लिटर पाणी मिळेल, हा उद्देश समोर ठेऊन केंद्र सरकारने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला. 2020 पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. या कामासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार नगर जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. तसेच गाजावाजा करत हर घर नल से जल’ या उद्देशातून सुरू केलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाने पाणी मिळणार आहे.
जिल्ह्यात 7 लाख 98 हजार 583 नळजोडणीची कामे होणे आवश्यक आहे. मात्र 6 लाख 73 हजार 427 नळजोडणीची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे. अर्थात ही कामे यापूर्वीच्या अन्य पाणीयोजनांच्या माध्यमातून झाली आहे. आता 1 लाख 25 हजार 136 नळजोडणीची कामे प्रलंबित आहे.