युरो चषक फुटबॉल; उपांत्यपूर्व फेरीचा थरार उद्यापासून

जर्मनीमध्ये सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार आता उत्तरार्धाकडे झुकलाय. 24 संघांच्या सहभागाने या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. आता उपांत्यपूर्व फेरीपर्यंत आठ संघ उरले आहेत. गतविजेत्या इटलीसह काही बलाढय़ संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र फ्रान्स, इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन व यजमान जर्मनी या पाच संघांनी अपेक्षेप्रमाणे उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. याचबरोबर नेदरलॅण्ड, स्वित्झर्लंड व तुकाa या संघांनीही अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार, 5 जुलैपासून  रंगणार आहे.

2020 च्या युरो चषक स्पर्धेत पोर्तुगाल-फ्रान्स यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता, मात्र उभय संघातील स्टार खेळाडू यंदा आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. ख्रिस्तियानो रोनाल्डो व किलियन एम्बाप्पे यांचे तुफान बघायला न मिळाल्याने चाहत्यांची निराशा होत आहे, मात्र स्वित्झर्लंडचा संघ या स्पर्धेत ‘डार्क हॉर्स’ ठरलाय.  जर्मनीसारख्या संघाला स्वित्झर्लंडने घाम पह्डला होता, मात्र यजमान संघाचे नशीब बलवत्तर म्हणून ही लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली.

त्यानंतर त्यांनी गतविजेत्या इटलीला पराभवाचा धक्का देत स्पर्धेतून आऊट केले. या विजयाने मनोबल उंचावलेला स्वित्झर्लंडचा संघ आता इंग्लंडला हरविण्याची स्वप्ने बघू लागलाय. तुकाaने ऑस्ट्रियासारख्या बलाढय़ संघाला स्पर्धेत बाहेर केलेले आहे. त्यामुळे नेदरलॅण्डलाही कडवी टक्कर देण्याची या संघात नक्कीच धमक आहे.

स्पेन-जर्मनी, फ्रान्स-पोर्तुगाल भिडणार

स्पेन-जर्मनी यांच्या लढतीने उपांत्यपूर्व फेरीला प्रारंभ होणार असून शनिवारी पोर्तुगाल-जर्मनी हे दोन बलाढय़ संघ भिडणार आहेत. हे चारही संघ युरो चषक स्पर्धेतील विजेतेपदाचे दावेदार असले तरी यातील दोनच संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. दुसरीकडे इंग्लंडला स्वित्झर्लंडकडू कडवे आव्हान मिळण्याची शक्यता असून अखेरच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलॅण्ड व तुकाa यांच्यात सामना रंगणार आहे.

युरो चषकातील उपांत्यपूर्व फेरी

दिनांक  सामना                 ठिकाण    वेळ

5 जुलै   स्पेन वि. जर्मनी    स्टुटगार्ट      रात्री 9ः30

6 जुलै   पोर्तुगाल वि. फ्रान्स   हॅम्बर्ग      रात्री 12ः30

6 जुलै   इंग्लंड वि. स्वित्झर्लंड  डसेल्डोर्फ  रात्री 9ः30

7 जुलै   नेदरलॅण्ड वि. तुर्की   बर्लिन      रात्री  12ः30