ईपीएफओचे मोबाईल ऍप लवकरच; जूनपासून एटीएममधून काढा पीएफ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) संघटनेच्या सदस्यांसाठी गुड न्यूज आहे. ईपीएफओचे एटीएम कार्ड आणि मोबाईल ऍप लवकरच लाँच होणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनुसख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओचे डेबिट कार्ड आणि मोबाईल ऍप सुविधा या वर्षी मे-जूनपर्यंत सुरू होईल.

सध्या ईपीएफओ 2.0 अंतर्गत संपूर्ण आयटी प्रणाली अपग्रेड केली जाईल. ईपीएफओ 3.0 ऍप वर्षाच्या मध्यापर्यंत लाँच होईल. त्यामुळे ईपीएओचे दावे निकाली काढणे सोपे होईल.

ईपीएफओ 3.0च्या माध्यमातून देशातील कोणत्याही ठिकाणाहून बँकिंग सुविधा मिळवण्याबाबत वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यानुसार अंमलबजावणी झाल्यास ईपीएफओ सदस्य डेबिट कार्ड
ऍक्सेस करू शकतील आणि एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकतील.

पीएफधारकांना एटीएमच्या माध्यमातून पीएफची संपूर्ण रक्कम काढता येणार नाही. पैसे काढण्याची मर्यादा लागू केली जाईल.

या सेवेचा फायदा म्हणजे पीएफचे पैसे काढण्यासाठी पीएफ कार्यालयात जायची गरज नाही.