![epfo](https://www.saamana.com/wp-content/uploads/2019/10/EPFO-696x447.jpg)
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) आणि बँक खात्याला आधारशी जोडण्यासाठी 15 फेब्रुवारी 2025 ही अखेरची डेडलाईन आहे. याआधी ही डेडलाईन 15 जानेवारी होती. कर्मचाऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत बँक खात्याला आधारशी जोडले नाही तर त्यांना भविष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ईपीएफओकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आपला यूएएन नंबर सक्रिय करून त्याला आधार आणि बँक खात्याशी जोडावे लागेल. त्यानंतर कर्मचारी रोजगार आधारित प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवू शकतील.