पीएफ क्लेम सेटलमेंट होणार एकदम सोपी, आता एक मेंबर एक यूएएन नंबर

नोकरदार मंडळींसाठी आता पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम काढणे यापुढे सोपे होणार आहे. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आपले सॉफ्टवेअर अपडेट करत आहे. नवीन सॉफ्टवेअर मॉड्युलमध्ये ईपीएफओ सदस्याला यूएएन नंबरचा वापर करून क्लेम सेटलमेंट करता येईल.

नव्या सॉफ्टवेअरमध्ये एक मेंबर एक अकाऊंट यंत्रणा लागू केली जाऊ शकते. त्यामुळे पी फ क्लेम सेटलमेंटच्या वेळी येणाऱ्या त्रासापासून सुटका होईल. एप्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन 2.01 प्रोजेक्ट अपग्रेड करत आहे. यामध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टीम येईल. त्यामुळे क्लेम सेटलमेंट प्रक्रिया सुरळीत होईल आणि खातेधारकांना पीएफचे पैसे काढणे सोपे जाईल. एप्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आपल्या प्रत्येक सदस्याला एक यूएएन नंबर देतात. नोकरदाराने नोकरी बदलल्यानंतरही नव्या यूएएन नंबरसाठी अर्ज करू नये, एकच नंबर कायम ठेवावा, असा सल्ला ईपीएफओ देते. दोन यूएएन नंबर असतील तर क्लेम सेटलमेंटच्या वेळी अडचणी येतात.

घर किंवा लग्नासाठी एक लाखापर्यंतचा क्लेम

ईपीएफओने घर, विवाह, शिक्षणसाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा 50 हजारांवरून 1 लाखापर्यंत वाढवली आहे. ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात 1.15 कोटी क्लेम असे होते, ज्यांना ऑटो मोडद्वारे सेटल करण्यात आलंय.