ईपीएफच्या रकमेत सहा वर्षांत पाच पटीने वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या निष्क्रिय खात्यांमधील एकूण रक्कम आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तब्बल 8 हजार 505 कोटींवर पोहोचली आहे. म्हणजेच ईपीएफच्या रकमेत सहा वर्षात पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ही रक्कम 2 हजार 638 कोटी रुपये इतकी होती. पेंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ईपीएफ योजनेत रकमेचा दावा करण्यात न आलेली खाती नाहीत. परंतु, ही योजना 1952 मधील परिच्छेद 72 (6) अंतर्गत वर्गवारी करण्यता आलेली निष्क्रिय खाती आहेत. 2023-24 च्या अखेरीस 21 लाख 55 हजार 387 निष्क्रिय खाती असून त्यात 8 हजार 505 कोटी रुपये पडून आहेत. त्याआधी 2022-23 या वर्षात 17 लाख 44 हजार 518 निष्क्रिय खाती होती. त्यात 6 हजार 804 कोटीरुपये होते. वर्ष 2018-19 मध्ये 6 लाख 91 हजार 774 निष्क्रिय खात्यांमध्ये 1 हजार 638 कोटीरुपये होते, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.