पर्यावरणवादी मोहन हिरालाल यांचे निधन

गडचिरोलीच्या लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देणारे आणि पर्यावरण तसेच वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले.

जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सक्रिय सदस्य होते. गांधीजी-विनोबाजींच्या जनशक्तीच्या प्रबंधावर त्यांचा विश्वास होता. 1984 मध्ये गडचिरोली जिह्यात त्यांनी वृक्षमित्राची स्थापना केली. ते निःस्वार्थी सहयोगी मित्र, एक कार्यकर्ता आणि ग्रामस्वराज संकल्पनेचा प्रसार करणारे एक जाणकार कार्यकर्ते होते. मोहन हिरालाल यांनी गावक ऱ्यांना महिलांचा सहभाग, दारूबंदी, वनसंरक्षण आणि हक्क, भ्रष्टाचाराविरोधात लढा, सांस्कृतिक हक्क, युवा सक्षमीकरण, शाश्वतता, समानता आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत केली. जंगलावरील कायदेशीर अधिकाराबाबतच्या त्यांच्या लढय़ामुळे सरकारने 2009 मध्ये सरकारने वन हक्क कायदा 2006 अंतर्गत मेंढा आणि मर्दा या गावांना सामुदायिक वन हक्क प्रदान करण्यात आले.