फक्त चेहरा स्कॅन करून एअरपोर्टवर प्रवेश; ‘डिजियात्रा’च्या युजर्सची संख्या एक कोटींच्या पार

विमान प्रवासात विमानतळावर बोर्डिंग आणि सिक्युरिटी चेकिंगमध्ये वेळ जातो. त्यामुळे प्रवाशांना दीड-दोन तास आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना करण्यात येते. प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून सरकारने दोन वर्षांपूर्वी ‘डिजियात्रा’ नावाचे तंत्रज्ञान आणले. या ‘डिजियात्रा’ अॅपला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘डिजियात्रा’च्या युजर्सची संख्या एक कोटीच्या पार गेली आहे. तसेच या प्लॅटफॉर्मवर दिवसाला 30 हजार डाऊनलोड होत आहेत. यावरून हे अॅप लोकप्रिय झाल्याचे दिसून येतंय. ‘डिजियात्रा’ हे खास टेक्नॉलॉजी अॅप आहे. यामध्ये प्रवाशाचा चेहरा हीच ओळख असेल. आयडी प्रूफ आणि बोर्डिंग पासची गरज पडणार नाही. 1 डिसेंबर 2022 पासून ‘डिजियात्रा’ अॅपची सुरुवात झाली. डिजियात्रा देशातील 24 विमानतळांवर उपलब्ध आहे.