
मुद्रांक शुल्क तथा रेडी रेकनरमध्ये सरासरी 4.16 टक्के वाढ झाल्यानंतर नवे दर लागू झाले. पुण्यामध्ये लॉ कॉलेज रस्ता हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. या परिसरात सदनिकेचा दर प्रतिचौरस मीटर एक लाख 80 हजार 950 रुपये इतका आहे, तर आऑफिससाठीचा दर दोन लाख आठ हजार 100 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे.
पुण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या कोरेगाव पार्क परिसराला लॉ कॉलेज रोडने मागे टाकले आहे. कोरेगाव पार्क परिसरात सदनिकांचा दर एक लाख 79 हजार 490 रुपये प्रतिचौरस मीटर, तर आऑफिससाठीचा दर हा दोन लाख सहा हजार 420 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे. शहरातील जमीन, सदनिका, ऑफिस आणि दुकानांचे दर देण्यात आले आहेत. त्यातील आकडेवारीनुसार शहरातील ‘टॉप-टेन’ भागांतील दर नोंदणी विभागाने जाहीर केले आहेत.
जंगली महाराज रस्ता या परिसरात दुकानांचा दर चार लाख ७५ हजार 940 रुपये प्रतिचौरस मीटर आहे. तर, शहरात जमिनीचा सर्वाधिक कमी दर हा नांदोशी गावात असून, या ठिकाणी दोन हजार 170 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे. त्याखोलाखाल किरकटवाडी येथे दोन हजार 680 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे.
भागाचे नाव जमिनीचा दर सदनिकेचा दर आऑफिसचा दर
■ प्रभात रोड, भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड ८६,७१० रुपये १,६५,२२० रुपये १,९०,०१० रुपये
■ गरवारे कॉलेज ते एसएनडीटी कॉलेज रोड ८१,५२० रुपये १,५१,८७० रुपये १,७४,६६० रुपये
ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्ता
■ ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्ता ७७,९५० रुपये १,३५,७७० रुपये १,५६,१४० रुपये
■ गोखले चौक ते बाजीराव रोड-लक्ष्मी रोड ७७,२२० रुपये १,१४,७२० रुपये १,८५,४४० रुपये
■ लॉ कॉलेज, टीपी स्कीम नंबर १ ७७,००० रुपये १,३०,१६० रुपये १,५२,२२० रुपये
■ भांडारकर रोड, टीपी स्कीम नंबर १ ७६,६३० रुपये १,४०,४९० रुपये १,६१,५७० रुपये
■ के. पालकर रोड, प्रभात रोड गल्ली क्रमांक ७ ७५,१७० रुपये १,५५,६७० रुपये १,७९,०३० रुपये
■ लकडी पूल ते गोखले चौक-लक्ष्मी रोड ७३,२५० रुपये १,२४,१७० रुपये १,६२,९४० रुपये
■ घोले रोड टीपी स्कीम १ ७३,०१० रुपये 1,22,660रुपये 1,44,080 रुपये
■ आपटे रोड, टीपी स्कीम नंबर १ ७२,९८० रुपये 1,17, 030 रुपये 1,45,790 रुपये