मी अभिनयाची सुरुवात पथनाट्यांपासून केली. अभिनय हा माझ्यासाठी एक मार्ग होता, या प्रवासात मला अनेक चांगले लोक भेटले. त्यात सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि अजय देवगण सारख्या लोकांचा समावेश आहे. या सर्व लोकांकडून मला खुपा काही शिकायला मिळालं.
मला आयुष्यात पर्यवरणासाठी काही तरी शाश्वत करण्याची इच्छा होती. मी कधीच निवडणूक लढवली नाही, पण या मुद्द्यांवर काही लोकांना पाठिंबा दिला होता. 2020 साली दादा पंडित देव प्रभाकर शास्त्री यांचे निधन झाले. त्यांनी मला अभिनयावरच लक्ष देण्याचे आदेश दिले होते.
1990 साली काही खास इच्छा नसताना मी राजकारणात आलो होतो. कारण अभिनयानंतर मला राजकारणात रस होता. जर मी अभिनेता झालो नसतो तर मी पत्रकार किंवा राजकीय नेता झालो असतो. कारण या दोन्ही क्षेत्रात अभिव्यक्तीला महत्त्व आहे.