राणी माझ्या मळ्यामंधी घुसशील काय? अभिनेत्री रमली सेंद्रीय शेतीत

मराठी सनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे शहरी जीवनाच्या दगदगीपासून दूर जाऊन गावात नवऱ्यासोबत सेंद्रीय शेती करत आहे. त्यासोबतच तिने शेतात स्ट्रॉबेरीसह अनेक रोपे लावली आहेत. तसेच कुत्रे आणि कोंबड्याही पाळल्या आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीत मृण्मयीने तिच्या बदललेल्या आयुष्याबद्दल सांगितले. मृण्मयी शहरापासून दूर महाबळेश्वरमधील एका गावात जाऊन नवरा स्वप्नील राव सोबत सेंद्रीय शेती करत आहेत. तिथे ते शेतीत घरासाठी लागणारा भाजीपाला पिकवतात. तसेच मृण्मयीने शहरातली दगदग आणि वार्षिक खर्चाबद्दल सांगितले. ती म्हणाली, मला वर्षाला वीस हजार खर्च फक्त कपड्यांसाठी लागायचा जो माझ्या कामानुसार होता. मात्र, शेतीमध्ये आल्यानंतर आमचा आठवड्याला 500 ते 600 तर महिन्याला 2000 इतका आहे आणि आम्ही या रुपयांत अगदी आनंदात जगत आहोत. गेल्या पाच वर्षांत मी असे वारंवार कपडे खरेदी केलेले नाही. आम्ही घेतलेल्या दोन कुत्र्यांना लागणाऱ्या चिकनसाठी कोंबड्या पाळल्या आहेत. त्यामुळे कुत्र्यांना लागणाऱ्या चिकनचा खर्च कमी झाला आहे. आणि कोंबड्यांमुळे त्यांना देखील अंडी मिळतात. याचबरोबर मृण्मयीला गाय घेण्याची इच्छा असल्याचं मृण्मयीने सांगितलं. मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नील राव शेतीसोबतच कार्यशाळा देखील चालवतात.