
बॉलिवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. वयाच्या 60 व्या वर्षी आमिर त्याची मैत्रीण गौरी स्प्राटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आमिरने आपल्या वाढदिवसशी आपली नवी गर्लफ्रेंड गौरीची मीडियासमोर ओळख करून दिली.
आमिर आणि गौरी गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर शुक्रवारी वाढिवसानिमित्त आमिरने मीडियासमोर गौरी आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आमिरच्या आयुष्यातील आलेली गौरी स्प्राट नेमकी कोण आहे जाणून घेऊया.
कोण आहे गौरी स्प्राट?
गौरी स्प्राट ही मूळची बेंगळुरूची असून तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणि लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गौरी 2007 पासून एका लोकप्रिय सलूनची भागीदार आणि संचालक आहे. गौरीने लंडनच्या कला विद्यापीठातून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये पदवी घेतली आहे. गौरी तिचे वैयक्तिक जीवन खाजगी ठेवण्यास प्राधान्य देते, म्हणूनच आमिरने छायाचित्रकारांना तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याची विनंती केली.
आमिर आणि गौरी स्प्राटची पहिली भेट 25 वर्षांपूर्वी झाली होती. मात्र दोघेही आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. दोन वर्षांपूर्वी ते पुन्हा संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांच्यातील नाते फुलले.