Euro Cup 2024 : इंग्लंडची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक; जेतेपदासाठी स्पेनशी सामना

जर्मनीच्या डॉर्टमुंडमधील बीवीबी मैदानावर खेळल्या गेलेल्या सेमीफायनल लढतीत नेदरलँडचा पराभव करत इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. इंग्लंडने नेदरलँडचा 2-1 असा पराभव केला. फायनलमध्ये आता इंग्लंडचा सामना स्पेनशी होणार आहे. पहिल्या सेमीफायनल लढतीत स्पेनने फ्रान्सचा पराभव करत फायनल गाठली आहे.

हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला नेदरलँडच्या जेवी सिमन्स याने गोल करत नेदरलँडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र नेदरलँडचा हा आनंद फार काळ टीकला नाही. यानंतर आठच मिनिटात इंग्लंडचा स्टार खेळाडू हॅरी केन याने गोल तर इंग्लंडला बरोबरीत आणले. यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोलपोस्टवर हल्ले चढवले. मात्र निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना आणखी एकही गोल करता आला नाही.

Euro Cup 2024: यमालची धमाल; एक तपानंतर स्पेनची फायनलमध्ये धडक

निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याचा निकाल आता पेनल्टी शूटआऊटद्वारे लावावा लागणार हे जवळपास निश्चित झालेले. पण इंग्लंडच्या ओली वॉटकिन्स याने अतिरिक्त वेळेमध्ये धमाकेदार गोल करत संघाला 2-1 ने विजयी करत फायनलमध्ये पोहोचवले.