
नेरुळ येथील लोटस तलावाजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी भराव टाकून पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी नवी मुंबई पालिकेला जाब विचारला. त्यावर 29 एप्रिलपूर्वी कारवाई करून सदर बेकायदा बांधकामे हटविण्याची हमी प्रशासनाने दिली.