
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आज सकाळपासून बारामुल्लाच्या उरी सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी तब्बल दहा तासांपासून गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जंगलात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
सायंकाळी तंगमर्ग परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. अजूनही चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना एलओसीतून घुसखोरी करताना पाहिले होते. दहशतवाद्यांकडून 2 असॉल्ट रायफली, स्पह्टके, काडतुसे, पाकिस्तानी चलन, चॉकलेट आणि सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. चिनार पोलीस इंडियन आर्मीने एक्सवरून याबाबतची माहिती दिली आहे. आज बारामुल्ला येथील उरी खोऱ्यात 2 ते 3 दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना रोखले आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारून म्हणाली, जय हिंद विनय!
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदुस्थानी नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाजवळ सुन्न होऊन बसलेल्या त्यांच्या पत्नीचा पह्टो पाहून देशभरातील नागरिक स्तब्ध झाले. आज त्यांच्या पत्नीने पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय अॅम प्राऊड ऑफ यू विनय एव्हरीटाईम… जय हिंद! असे म्हणत हिमांशी यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांनी टाहो पह्डताच उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.