
आरोग्यासाठी ग्रीन टी हा खूप महत्त्वाचा मानला जातो. खासकरुन वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिण्याची क्रेझ आपल्याला दिसून येते. ग्रीन टी पिण्यामुळे शरीर डिटॉक्स होते, म्हणूनच वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा सर्वात बेस्ट पर्याय मानला जातो. काही जण म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणे उत्तम असते, तर काहीजण हा चहा सकाळी उठल्यावर पितात. ग्रीन टी पिण्याची नेमकी कोणती पद्धत बेस्ट आहे हे आपण पाहुया.
ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत कोणती?
नाश्त्याच्या एक तास आधी आपण ग्रीन टी पिऊ शकतो. एका संशोधनानुसार, ग्रीन टीमध्ये टॅनिन आढळते, ते जेवणाच्या 1 ते 1.5 तास आधी सेवन केले तर ते बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करू शकते.
सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी पिल्याने चयापचय गतिमान होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
दिवसातून 3 ते 4 कपपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका.
ग्रीन टीमध्ये कॅफिन आढळते. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर उलट्या आणि जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात.
ग्रीन टीची चव कडू असते, म्हणून बरेच लोक त्यात साखर घालून ते पितात. असे केल्याने तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होणार नाही.
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळच्या व्यायामानंतर अर्धा तासानंतर
सकाळी 11 ते दुपारी 12 दरम्यान
जेवणाआधी 1 तास
संध्याकाळी नाश्त्यानंतर 1 किंवा 2 तासांनी
रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊ नका कारण त्यामुळे निद्रानाश होऊ शकतो.
रिकाम्या पोटी ग्रीन टी पिण्याचे फायदे?
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे चयापचय वाढवते. चयापचय वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.
एका संशोधनानुसार, ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल आढळतात. पॉलीफेनॉल ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.
ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅफिन चहा आणि कॉफीमध्ये आढळणाऱ्या कॅफिनपेक्षा चांगले मानले जाते. हे मेंदूसाठी प्रतिबंधात्मक न्यूरोट्रांसमीटरची प्रक्रिया थांबवण्याचे काम करते, ज्यामुळे मेंदू निरोगी राहतो. जे लोक खूप तणावाखाली आहेत त्यांना देखील ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो.
दररोज 1 ते 2 कप ग्रीन टी पिल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही ते फायदेशीर ठरू शकते.
ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)