![elon musk](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/04/elon-musk-696x447.jpg)
उद्योगपती एलन मस्क यांनी वर्क कल्चरसंबंधी एक वादग्रस्त विधान केले आहे. कर्मचाऱ्यांनी दररोज किमान 17 तास आणि आठवड्याला 120 तास काम करावे, असे एलम मस्क यांनी म्हटलेय. परंतु, अनेकांनी मस्क यांचे हे विधान म्हणजे मस्करी आहे. दररोज 17 तास कार करणे शक्य नाही, असा सूर आवळला आहे. तर सोशल मीडियावर या विधानावरून दोन गट पडले असून वाद उभा राहिला आहे. मस्क यांनी एक ट्विट केले असून यात म्हटले की, आमचा सरकारी दक्षता विभाग आठवड्यात 120 तास काम करत आहे. तर नोकरशहा वर्ग केवळ 40 तास काम करत आहे. त्यामुळे याचा फटका बसत आहे. जर 120 तासाची सात दिवसात विभागणी केली तर दररोज 17 तास काम करावे लागेल. अधिक उत्पादक बनवण्यासाठी रोज 17 तास काम करणे आवश्यक आहे. वर्किंग अवर्सवरून मस्क यांच्या आधीही अनेक मोठ्या बिझनेस लीडर्सनी जास्त तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये नारायण मूर्ती, एसएन सुब्रमण्यम यांचा समावेश आहे.
..तर व्यक्तीला स्ट्रोकचा धोका
आठवड्यात 55 तासांपेक्षा अधिक तास काम केल्यास स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका 35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आली आहे. जास्त काम केल्यास व्यक्तीचे डिप्रेशन वाढते तसेच बर्नआऊट सारखी समस्या निर्माण होते, असेही या अहवालात म्हटले आहे. जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या मोठे नुकसान होऊ शकते.