
कंपनी बदलताना किंवा नोकरी सोडताना प्रत्येकाला सध्याच्या कंपनीत राजीनामा पत्र द्यावे लागते. राजीनाम्यात कंपनी सोडण्याचे कारण द्यावे लागते. एका कर्मचाऱ्याने सात शब्दांत आपला राजीनामा लिहिला आणि ते पत्र कंपनीच्या डेस्कवर सोडून तो कर्मचारी बेपत्ता झाला. काही दिवसांनी कंपनीमध्ये त्याचे राजीनामा पत्र सापडले. ‘चॅरिटी अकाऊंटिंग माझ्यासाठी नाही. मी राजीनामा देतो.’ असे त्याने एका कोऱ्या कागदावर हस्ताक्षराने लिहिले होते.