नागपूर-कोलकाता विमानाला बॉम्बची धमकी, रायपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

बॉम्बची धमकी मिळाल्याने नागपूर-कोलकाता विमानाचे गुरुवारी सकाळी रायपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रायपूर विमानतळावर विमानाची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

इंडिगो विमान क्रमांक 6E812 गुरुवारी सकाळी नागपूरहून कोलकाताला चालले होते. विमानात 187 प्रवाशी आणि 6 क्रू मेंबर्स होते. यादरम्यान विमानात बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे रायपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.

प्रवाशी आणि क्रू मेंबर्सना विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. यानंतर तपासणीसाठी उड्डाण आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. धमकी प्रकरणी रायपूर पोलिसांनी एका प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.

गेल्या महिनाभरात विविध एअरलाईन्सच्या 500 हून अधिक विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली.