Elvish Yadav – एल्विश यादवविरोधात ईडीची मोठी कारवाई, संपत्ती केली जप्त

‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्युबर एल्विश यादव आणि पंजाबी गायक फाजिलपुरिया विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एल्विश यादवसह फाजिलपुरिया अडचणीत सापडले आहेत.

एल्विश यादव हा ‘बिग बॉस ओटीटी’ जिंकल्यानंतर रेव्ह पार्टित विषारी सापांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात होता. शिवाय त्याच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता त्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने एल्विश आणि त्याच्यासोबत गायक फाजिलपुरिया यांची चौकशी करुन त्यांना कार्यालयात बोलावून त्यांचे जबाब घेतले होते. ईडीने आज एल्विशची उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील संपत्ती जप्त केली आहे. त्याच्यासोबत फाजिलपुरिया याचीही संपत्ती जप्त केली आहे.

एल्विश यादव याच्यावर आरोप आहे की, त्याने अवैधरित्या पैसे कमावून संपत्ती खरेदी केली होती आणि यामध्ये फाजिलपुरिया यानेही त्याची साथ दिली होती. आधी नोएडा पोलिसांनी एल्विशला विषारी सापांची तस्करी प्रकरणात अटक केली होती, त्यानंतर ईडीनेही त्याच्याविरोधात तपास सुरु केला होता.