
एलन मस्कची कंपनी एक्स कॉर्पने भारत सरकार विरोधात याचिका दाखल केली आहे. कंपनीने सरकारच्या आयटी कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या कायद्यानुसार सरकार कंटेट ब्लॉक करत असल्याचा आरोप कंपनीने केला आहे.
एक्सने भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 (3) बीवर प्रश्रचिन्ह उपस्थित केले आहे. या कायद्यातील ही तरतूद बेकायदेशीर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या नियमामुळे एक अनियमित सेन्सरशिप निर्माण होते, त्यामुळे कंटेट ब्लॉक होतो सोशल साईटवर प्रभाव पडतो असे कंपनीने म्हटले आहे.
कुठल्या परिस्थितीत सरकारला इंटरनेटवरी कंटेट हटवण्याचा अधिकार आहे हे नियमात म्हटले आहे. कंटेट हटवण्यासाठी लेखी कारण देणे स्पष्ट असतं आणि निर्णय घेण्यापूर्वी योग्य सुनावणी होणे गरजेचे आहे. तसेच या कायद्याला आव्हान देण्याचाही हक्क असला पाहिजे असे म्हणत कंपनीने कोर्टात याचिका दाखल केली आहे.