
एलोन मस्क यांचे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स सोमवारी सायंकाळी जगभरात पुन्हा एकदा डाऊन झाले. दिवसभरात तीन वेळा एक्स ठप्प झाले. यामुळे युजर्सना लॉग इन करण्यास अडचणी येत होत्या. याबाबत युजर्सनी डाऊन डिटेक्टर वेबसाईटवर तक्रार दाखल केली आहे.
डाउन डिटेक्टर वेबसाइटनुसार, दुपारी 3.30 वाजता पहिल्यांदा एक्स ठप्प झाले. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता युजर्सना लॉग इन करण्यात समस्या येऊ लागल्या. तिसऱ्यांदा, रात्री 8.44 वाजता X पुन्हा डाऊन झाले. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना अॅप आणि साइटवर समस्या येऊ लागल्या.
युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारतासह अनेक देशांनी युजर्सनी X बद्दल तक्रार केली. जगभरात 40,000 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. डाउन डिटेक्टर वेबसाइटच्या अहवालानुसार, 56 टक्के वापरकर्त्यांना अॅपमध्ये, 33 टक्के वापरकर्त्यांना वेबसाइटमध्ये तर 11 टक्के लोकांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या असल्याचे नोंदवले.