
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे उद्योजक एलन मस्क अनेकदा विचित्र निर्णय घेतात. आताही त्यांनी एका मोठा निर्णय घेत जगाला चकित केले आहे. एलन मस्क यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (आधीचे ट्विटर) आपल्याच एका कंपनीला विकले आहे.
एक्स विकल्याची माहिती एलन मस्क यांनी स्वत: पोस्ट करून दिली आहे. कोट्यवधी युजर असलेले हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म मस्क यांनी आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीला तब्बल 33 अब्ज डॉलरला विकले आहे. शुक्रवारी त्यांनी या डीलची माहिती दिली.
टेस्ला आणि स्पेसअक्सचे सीईओ एलन मस्क यांनी 2022 मध्ये 44 अब्ज डॉलर मोजून ट्विटर खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी ट्विटरला ‘एक्स’ असे नाव दिले होते. एवढेच नाही तर ट्विटरची चिमणीही हटवत काही नवीन बदलही केले होते.