ईव्हीएमने निवडणुकीत हेराफेरी होते, बॅलेट पेपरनेच मतदान घेतले पाहिजे; एलन मस्क यांचे परखड मत

संगणक प्रोग्राम हॅक करणे सोपे आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणुकीत हेराफेरी केली जाते, असा दावा करत निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी केली आहे.

अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. एलॉन मस्क उघडपणे ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत. डोमिनियन पंपनीच्या मतदान यंत्रांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करताना मस्क म्हणाले, फिलाडेल्फिया आणि ऑरिझोनव्यतिरिक्त या ईव्हीएम मशीन्स इतरत्र कुठेही वापरल्या जात नाहीत. या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला. हा विचित्र योगायोग आहे.