एलन मस्कने मुद्दा उचलला; ब्रिटनमधील पाकिस्तानी ग्रुमिंग गँगची जगभर चर्चा

ब्रिटनमधील हजारो मुलींचे पाकिस्तानी पुरुषांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ब्रिटनमधील ग्रुमिंग गँगचा मुद्दा समोर आणल्यानंतर आता युरोपसह जगभरात खळबळ उडाली आहे. ग्रुमिंग गँग हा गुन्हेगारांचा एक गट असून या गटात पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा समावेश आहे. ते ब्रिटनमधील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप आहे.

सोशल मीडिया, गेमिंग आणि चॅट रुम्स अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर करून हे लोक अल्पवयीन मुलींना हेरतात. ग्रुमिंग गँगचे गुन्हेगार मुलींना नशेच्या आहारी नेवून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो गोळा करून नंतर त्यांचे लैंगिक शोषण करतात. लैंगिक अत्याचाराच्या गर्तेत सापडलेल्या अनेक मुली गर्भवती राहिल्या, तर काही जणींची मानवी तस्करी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये 1.15 लाख लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 4,228 गुन्हे हे संघटित गुन्हेगारीच्या प्रकारात मोडत आहेत. 17 टक्के गुह्यात ग्रुमिंग गँगचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

ब्रिटनच्या ओल्डहॅम, रॉदरहॅम आणि टेलफोर्ड कॉर्नवाल आणि इतर शहरात 1997 ते 2013 पर्यंत कमीतकमी 1400 अल्पवयीन मुलींना लैंगिक अत्याचाराचे शिकार बनविल्याची माहिती समोर येत आहे.

 राजेश्वरीने आपल्या 3 वर्षीय मुलगी खुषबूला सांगितले की, कपडे आणि भाज्या आणण्यासाठी बाजारात जातेय, परंतु ती अनेक तासांनंतर घरी परतली नाही. म्हैस विकून घरात ठेवलेले पैसेसुद्धा राजेश्वरी घेऊन गेली. ती नक्की त्या नन्हे भिकाऱ्यासोबत पळून गेली असे राजूने म्हटले आहे.