एलॉन मस्क यांचे मिशन मंगळ; 9 महिन्यांचा प्रवास 90 दिवसात करता येणार

टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून नेहमी चर्चेत असतात. आता ते त्यांच्या मिशन मंगळमुळे चर्चेत आले आहेत. स्टारशिपच्या पहिल्या ऑर्बिटल लॉंचच्या घोषणेने अंतराळ समुदायात उत्साह निर्माण झाला आहे. एलॉन मस्क यांची ही योजना जर यशस्वी झाली तर अंतराळ प्रवासाचा संपूर्ण कायापालट होईल आणि मानवाला परग्रहावर वस्ती करणे शक्य होईल.

मिशन मंगळबाबत एलॉन मस्क यांनी मोठा दावा केला आहे.सध्या मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठविण्यास सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. परंतू इलॉन मस्क यांनी हा प्रवास 90 दिवसात होऊ शकतो असे म्हटले आहे. मंगळावर पोहचण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी मस्क अंतराळ यान स्टारशिपला वेगळ्या प्रकारे डिझाईन करीत आहेत. पूर्णपणे इंधनाने भरलेले हे अंतराळ यान 36000 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करु शकते असा दावा मस्क यांनी केला आहे. यामुळे पृथ्वी ते मंगळ या दरम्यानचे अंतर 80 ते 100 दिवसात पूर्ण करता येईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या मंगळावर जायला लागणाऱ्या वेळेच्या तुलनेने हे क्रांतीकारक पाऊल ठरणार आहे. स्टारशिप नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन केवळ 45 ते 90 दिवसात मंगळावर पोहचू शकते. त्यामुळे अशाप्रकारचे तंत्रज्ञान वापरून स्टारशिप डिझाइन करण्याचे मस्क यांचे प्रयत्न सुरू आहेत.