एलॉन मस्क यांना पुन्हा एकदा पुत्ररत्नाचा लाभ

जगप्रसिद्ध कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क आणि त्यांची पत्नी शिवॉन जिलीस यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या दोघांचे हे चौथे अपत्य आहे, तर मस्क यांचे 14 वे अपत्य आहे. शिवॉन जिलीस यांनी सेल्डन लाइकर्गस या मुलाला जन्म दिला आहे, अशी माहिती स्वतः शिवॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून दिली आहे.

मस्क यांच्याशी बोलल्यानंतर मला वाटले की, मुलाची माहिती शेअर करावी. तो खरोखर योद्धय़ासारखा शक्तिशाली आहे, परंतु त्याचे हृदय खूपच प्रेमळ आहे. आमचा तो खूपच लाडका आहे, असे शिवॉनने म्हटले आहे. एलॉन मस्क यांना एकूण 14 मुले आहेत. पहिली पत्नी जस्टिन विल्सनपासून पाच मुले, म्युजीशियन ग्राईम्सपासून तीन मुले, तर शिवॉन जिलीसपासून आता चार मुले झाली आहेत.