मस्क यांची ट्रम्प यांना 2200 कोटींची देणगी

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना एलन मस्क यांनी तब्बल 2200 कोटी रुपये दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठी स्थापन केलेल्या अमेरिका पीएसी या राजकीय कृती समितीला, 239 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2200 कोटी देणगी दिली होती.

याव्यतिरिक्त एलन मस्क यांनी आरबीजी पीएसी या संस्थेलाही 20 दशलक्ष डॉलर्स इतकी देणगी दिल्याची माहिती आहे. या संस्थेने गर्भपाताबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिगामी प्रतिमा बदलण्यासाठी काम केले होते.

वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार, मस्क यांनी दिलेल्या या देणगीनंतर त्यांनी टिम मेलन यांना मागे टाकले आहे. मेलन यांनी ट्रम्प यांना 200 दशलक्ष डॉलर्स इतकी देणगी दिली होती. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांना मोठे गिफ्ट देत अमेरिकन सरकारच्या ‘डोज’ विभागाची जबाबदारी सोपवली आहे.