लिंगबदल शस्त्रक्रिया ही मूलतः मुलाची हत्या आणि नसबंदीसारखी आहे. तसेच हा एक विषाणू आहे, अशा शब्दांत टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी लिंगबदल सर्जरीसंबंधी रोखठोक भाष्य केले. अमेरिकन समालोचक जॉर्डन पीटरसन यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले. कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान, मला फसवून माझ्या मुलाचे लिंग बदलण्यासंबंधी कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली होती. मला कळत नव्हते की काय होणार आहे. त्या वेळी कोरोनामुळे बराच गोंधळ उडाला होता. मला सांगण्यात आले की, माझा मुलगा आत्महत्या करू शकतो आणि त्यामुळे मी माझ्या मुलाला गमावले, असेही मस्क म्हणाले. या शस्त्रक्रियेला ‘डेडनेमिंग’ म्हटले जाते. कारण यामुळे मुलाचा मृत्यू होतो. शस्त्रक्रियेनंतर मी माझा मुलगा गमावला. तेव्हाच मी या व्हायरसशी लढण्याचे ठरवले होते. मस्क यांचा मुलगा झेवियरने 2022 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याचे लिंग बदलले. यानंतर झेवियरने आपले नाव बदलून विवियन जेना विल्सन असे ठेवले होते.