कोपरगाव तालुक्यात आकाशातून पडलं इलेक्ट्रिक यंत्र, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण

तालुक्यातील गोधेगाव शिवारातील एका शेतात आकाशातून पांढऱ्या रंगाचे चौकोनी आकाराचे अज्ञात इलेक्ट्रिक यंत्र पडल्याने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

गोधेगाव शिवारातील शेतकरी सतीश राजेंद्र पठाडे यांच्या शेतात काल मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी दुपारच्या सुमारास आकाशातून पांढऱ्या रंगाचे अज्ञात इलेक्ट्रिकल यंत्र पडल्याचे आढळून आले होते. आकाशातून यंत्र पडल्याने काही वेळ शेतकरऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र सुशिक्षित शेतकऱ्यांनी यंत्राची माहिती गुगलवर सर्च केली असता ते यंत्र हवमान विभागाशी संबंधित असून हवमानाचे मोजमाप करण्यासाठी वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर यंत्राबाबाद गावातील वरिष्ठांना कळवण्यात आले. अशाच प्रकारचे यंत्र काही दिवसांपूर्वी वैजापूर शिवारात सुद्धा आढळून आले होते. नागरिकांनी अशा प्रकारचे कोणतेही यंत्र किंवा वस्तू आढळून आल्यास तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय त्याला हात लावू नये. तसेच सर्वात आधी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना द्यावी.