सर्व्हे म्हणतो… विधानसभेलाही लोकसभेची पुनरावृत्ती; महाविकास आघाडी जोरात, महायुती कोमात

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होईल, असा दावा लोकपोलच्या सर्व्हेमधून करण्यात आला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील तर महायुती कोमात जाईल, असा हा सर्व्हे सांगतो.

विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र वेगवेगळे सर्व्हे यायला सुरुवात झाली आहे. लोकपोल संस्थेचा सर्व्हे नुकताच समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 141 ते 154 जागा जिंपून सरकार स्थापन करेल, असा निष्कर्ष या सर्व्हेमधून काढण्यात आला आहे.

महायुतीला विधानसभा निवडणुकीत फटका बसेल. महायुतीला 115 ते 128 जागांवर समाधान मानावे लागेल असे या सर्व्हेमध्ये नमूद आहे. मतांची टक्केवारीही त्यात देण्यात आली आहे. महायुतीला एकूण मतांच्या 38 ते 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये वाढ होऊन एकूण मतांच्या 41 ते 44 टक्के मते मिळतील, असा दावा या सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे. लोकपोलच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

अंतर्गत सर्व्हेतही भाजपची पीछेहाट

भारतीय जनता पक्षानेही एक अंतर्गत सर्व्हे केला आहे. त्यात विधानसभेमध्ये भाजपची पीछेहाट होईल असे म्हटले आहे. राष्ट्रवादी का@ंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्या सर्व्हेचा दाखला देत ट्विट केले आहे. त्या सर्व्हेमध्ये अजित पवार गटाला 7-11 जागा, मिंधे गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली गेली आहे. त्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये भीती पसरलीय आणि यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.