18 व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानानंतर आज निकालांचे कल समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वा लढणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडी आणि पळवा पळवी केली होती. त्याचा राग महाराष्ट्राच्या मनात होता. आता सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलातून तोच राग मतपेटीतून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे असं चित्र आहे.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाच्या आकेडेवारीवर नजर टाकल्यास महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष 10, काँग्रेस 11 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 8 जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजे सुरुवातीचे कल लक्षात घेता महाविकास आघाडी 29 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 11, शिंदे 6 आणि अजित पवार गट 1 जागेवर आघाडीवर आहे. तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.