
मतदार याद्यांमधील बोगस नावे, ईव्हीएममधील गडबड आणि मतदान केंद्र अशा विविध विषयांवर विरोधकांनी घेरल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने विविध स्तरांवर बैठकांचे आयोजन केले. निवडणूक आयोगाने देशभरात तब्बल 5 हजार बैठका घेतल्या. बैठकांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
निवडणूक आयोगाने 25 दिवसांत एकूण 4 हजार 719 बैठका घेतल्या. यात विविध पक्षांचे 28 हजारांहून अधिक प्रतिनिधी, निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी सहभाग घेतला. 31 मार्च 2025 पर्यंत बैठका घेण्यात आल्या. यात मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी 40 बैठका, जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी 800 तर निवडणूक नोंदणी अधिकाऱयांनी 3 हजार 879 बैठका घेतल्या.