महाराष्ट्रात लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तयारी आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्याचा दौरा करणार आहेत. त्यासाठी दिल्लीतले अधिकारी राज्यात येतील आणि राजकीय पक्ष, सीईओ, नोडल अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. या दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, ईडी आणि सीबाआयच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील.
महाराष्ट्रात निवडणूक घेण्यासाठी वातावरण किती योग्य आहे याचा अधिकारी आढावा घेतील. सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर 28 तारखेला सांयकाळी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर आयोगाचे अधिकारी दिल्लीला रवाना होतील.