लोकसभा निवडणुकीने केला अनोखा विक्रम, 64 कोटींहून अधिक मतदारांनी केलं मतदान

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीने एक विक्रम केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत 31.2 महिलांसह 64 कोटी हिंदुस्थानी मतदारांनी मतदान केलं आहे.

हे आकडे जी 7 देशांच्या मतदारांच्या दीडपट तर युरोपीयन संघाच्या 27 देशांतील मतदानाच्या अडीच पट अधिक आहेत. तसंच, यंदा लोकसभा निवडणुकीत जम्मू कश्मीर या राज्यांत गेल्या चार दशकांतील सर्वाधिक मतदान झालं आहे.

लोकसभा निवडणुकीत फक्त 39 जागांवर पुनर्मतदान झालं आहे. हाच आकडा 540 जागांवर पुनर्मतदान झालं होतं. तसंच, यंदाच्या निवडणुकीत हिंसाचारही कमी झाला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

या निवडणुकी 68 हजार देखरेख पथकं आणि दीड कोटी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसंच, 4 लाख गाड्या, 135 विशेष रेल्वे आणि 1692 विमानांचा समावेश करण्यात आला होता. तसंच, यंदाच्या निवडणुकीत रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारू अशा प्रकारे 10 हजार कोटींची जप्ती करण्यात आली आहे.