मिंधे गटाने मराठी मालिकांमधून छुपा प्रचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने मिंधे गटाला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
स्टार प्रवाह या वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेत शिंदे गटाचे बॅनर दाखवले गेले. या प्रकरणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याच मालिकांचे भाग ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होतात पण त्यात या जाहिराती दिसल्या नाहीत. त्यामुळे हा प्रचार करताना पैश्यांची देवाण घेवाण झाली का अशी शंकाही उपस्थित केली जात होती.
निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, स्टार प्रवाह वाहिनीवरील काही मालिका उदा. मातीच्या चुली, प्रेमाची गोष्ट व इतर काही मालीकांचे चित्रीकरण करताना त्यामध्ये आपल्या पक्षाच्या रस्त्यावरील जाहिराती दाखवून अशाप्रकारे आपला पक्ष छुपा मार्गाने प्रचार करीत असल्याची तसेच सदर छुप्या जाहीरातीसाठी आपला पक्ष काही रक्कम देण्याची शक्यता सदर तक्रारीमध्ये वर्तविण्यात आली आहे. सबब, सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे पुढील २४ तासाच्या आत या कार्यालयास सादर करावे, ही विनंती.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. तसेच 48 तासांत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेशही मिंधे गटाला देण्यात आले आहेत.
महायुतीने छुप्या जाहिराती करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या “घरोघरी मातीच्या चुली” या मालिकेत दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी प्रक्षेपित आणि १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता व ४ वाजता पुन: प्रक्षेपित भागात खुलेआम महायुतीच्या… pic.twitter.com/cK1eEtKHRC
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 15, 2024