कुठल्याही परिस्थितीत मिंधे मुख्यमंत्री होणार नाहीत, मिंध्यांचं अवतारकार्य संपलं; संजय राऊत यांचा घणाघात

कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे यांचे अवतारकार्य भाजप संपवणार आहे असेही राऊत म्हणाले.

आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुण्यात अनेक ठिकाणी कुख्यात गुंडांवर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस अधिकारी सत्यनारायण चौधरी यांनां आम्ही ती नावं देऊ शकतो. ठरवून गुंड घ्यायचे, काही गुंडांचे जामीन त्यासाठीच घेतले आहेत. अनेकांना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे.धक्कादायक म्हणजे पोलीस आणि गुंड यांच्या बैठका होतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस दर्जाचे आणि हे विधानसभा मतदारसंघात नेमलेल्या गुंडांची रात्री रीतसर बैठक होते. आणि मग या गुंडांकडून पोलिस आदेश देतात. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांन लक्ष्य करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. निवडणूक आयोगाला ही माहिती आम्ही देणार आहेत. कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या खात्याला माझे आवाहन आहे, सरकार बदलतं असतं. तुम्ही पोलीस खात्याला कलंक लावत आहात. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस खात्याची बेअब्रू करत आहात. सत्यनारायण चौधरी हे कायदा सुव्यवस्था प्रमुख आहेत, आपल्या खाली काय जळतंय हे पाहा. सरकार बदलतंय हे लक्षात घ्या. सरकार बदलणार आहे आणि या सगळ्यांचा हिशोब केला जाईल. चौधरी यांनी माझ्याकडे गुंडांची यादी मागितली तर मी यादी द्यायला तयार आहे. वर्षा बंगल्यावरू कुणाला काय आदेश येत आहेत, हे सत्यनारायण चौधरी इतकं कुणाला माहित नाही. मलाही धमक्या देऊ नका. गुंडांच्या मदतीने निवडणुका लढवू इच्छितात, हे लोक गुंडांचं राज्य आणू इच्छितात. लोकसभा निवडणुकीलाही तेच केलं आणि विधानसभा निवडणुकीलाही तेचं करत आहेत. पोलीस जर या गुंडांच्या माध्यमातून आम्हाल त्रास देत असतील तर महाविकास आघाडी या सर्वांची गांभीर्याने नोद घेत आहेत हे मी सांगू इच्छितो.

मला आलेल्या धमक्यांचा मी कधीही बाऊ केलेला नाही. ना मी ईडीला घाबरत ना मी सीबीआयला घाबरत ना मी गुंडांना घाबरत. आम्ही देवेंद्र फडणवीसांना लगेच फोर्स वनचे कमांडर लावायला सांगत नाही. ज्या गुंडांवर खून, हत्या, दरोडेखोरी, अपहरण अशा प्रकारचे गुन्हे आहेत, ज्यांनी दाऊदसोबत काम केले आहे. मिंधे आणि भाजप अशा लोकांना आमच्या विरोधात निवडणुकीत वापरत असतील तर जे काही घडणार असेल त्याची सर्व जबाबदारी पोलिसांची असेल.

शिवसेनेतल्या आमच्या लोकांना मोदींनीच वेगळं केलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदी आणि शहांनी वेगळं केलं. आपण काय बोलतोय हे आधी मोदी आणि शहांनी समजून घ्यावं. शिवसेनेतून आमचं कुटुंब फोडण्याचं काम मोदी शहांनी केलंय. 23 तारखेनंतर मोदी शहांनी सेफ रहावं. बटेंगे तो कटेंगे हे विधान महाराष्ट्रातल्या लोकांनी फेकून दिलं. आता एक हो तो सेफ है अशी घोषणा दिली आहे. मोदी शहांना अशी विधानं का करावी लागतात. या राज्यातली या देशातली जनता तुमची नाही का? महाराष्ट्रात आम्ही सेफ आहोत आणि जास्त सेफ व्हायचंय म्हणून आम्हाला भाजपला इथून काढायचं आहे. मोदी शहा महाराष्ट्रात आल्याने आम्ही अनसेफ होऊन जातो. मोदी शहा महाराष्ट्रात आल्यावर दंगलीसाठी भडकावतात.

मोदी काहीही म्हणू शकतात, त्यांचा म्हणणाल्या आगा पिछा नसतो. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मुख्यमंत्री हे दहशतवाद्याला सुरक्षा देतात. भाजपने गुंड जमा केले आहेत. काही गुंडांना तुरुंगातच काम दिले असून त्यांना मोबाईल फोन पुरवण्यात आले आहेत. हे गुंड आपापल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सूचना देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महाराष्ट्राची घाण करून ठेवली आहे.

कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. एकनाथ शिंदे यांचे अवतारकार्य भाजप संपवणार आहे. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का तर ते ही नाही. मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.