
कंत्राटदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मिंधे गटाचे पदाधिकारी लालसिंग राजपूतविरोधात गेल्या वर्षी गुन्हा दाखल होता. याप्रकरणी लालसिंग राजपूतला अखेर कांदिवली पोलिसांनी अटक केली. नुकताच राजपूतविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गेल्या वर्षी कांदिवली परिसरात रस्त्याचे काम सुरू होते. रस्त्याचे काम सुरू असताना मिंधे गटाचे पदाधिकारी लालसिंग राजपूतने कंत्राटदाराकडे खंडणी मागितली होती. कंत्राटदाराला कार्यालयात बोलावून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती. मारहाणप्रकरणी कंत्राटदाराने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.