मिंधे गटाकडून बीकेसीमधील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या गद्दारीचे समर्थन करीत रडगाणे लावले. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांचाच नव्हे तर लोकप्रतिनिधी, पदाधिका ऱ्यांचाही भ्रमनिरास झाला.
घटनाबाह्य रीतीने राज्यात अडीच वर्षांचे सरकार आले असताना शिंदेंनी मात्र आपण शिवसेनाप्रमुखांचे विचार जपण्यासाठी उठाव केल्याचे सांगितले. अगदी निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आणून विजय मिळवल्याचे बोलले जात असताना आपण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी या योजना आणल्याचा दावाही शिंदे यांनी केला. शिवाय विधानसभा निवडणुकीत महायुतीला ईव्हीएमच्या अफरातफरीने विजय मिळाल्याचे तज्ञांकडून सांगितले जात असताना शिंदेंनी मात्र पुन्हा एकदा जनतेनेच आपल्याला बहुमताने निवडून दिल्याचा दावा केला.