
स्थानिकांना विश्वासात न घेताच मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज माथेरानमध्ये ढवळाढवळ केली. माथेरानच्या प्रवेशद्वारावर असलेले ई-रिक्षा स्टॅण्ड – हटवून त्या ठिकाणी अश्वपालकांना जागा देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून थोरवे यांनी परस्पर निर्णयाचे हे घोडे दामटल्याने संताप व्यक्त होत असून बाहेरच्या व्यक्तीने येथे ढवळाढवळ करू नये असे सुनावले आहे. दस्तुरी नाक्यावर घोडे व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या बाजूने एकतर्फी निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा माथेरान बंदची हाक देण्यात येणार आहे.
माथेरान दस्तुरी नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांची घोडेस्वारांकडून लूट थांबविण्यासाठी माथेरान बचाव समितीकडून माथेरान बंद ठेवण्यात आले होते. हा माथेरान घोडे व्यवसाय तसेच विविध संघटनांमध्ये चर्चा होऊन मार्ग काढण्यात आला होता. यामध्ये माथेरान शहरात जाण्यासाठी प्रवेश मार्गावर एका बाजूस ई-रिक्षा आणि दुसऱ्या बाजूला घोडे व्यवसाय चालक उभे राहतील असे ठरले होते. दरम्यान, घोडे व्यावसायिकांनी आमदार थोरवे यांची नेरळ येथील कार्यालयात भेट घेताच थोरवे यांनी चक्रे फिरवली.
पार्किंगमध्येही करणार घुसखोरी
घोडे व्यवसाय हा संवादातून होत असतो. संवाद झाल्यास पर्यटक घोड्यावर बसण्यास तयार होतात. म्हणून पार्किंगमध्ये केवळ पाच जणांना जाण्यास थोरवे यांनी मुभा दिली आहे. त्यामुळे आता पार्किंगमध्ये घोडेस्वार घुसखोरी करून पर्यटकांना त्रास देतील असे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान, कुली व्यवसाय करण्यासाठीही दरपत्रक ठरवून येथे प्रदर्शित करण्यात यावे अशा सूचना अधिकारीवर्गांना करण्यात आल्या आहेत. मात्र हे सर्व करताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असताना थोरवे यांनी परस्पर चमकोगिरी केल्याने माथेरान बचाव समितीने संताप व्यक्त करत बाहेरून येणाऱ्यांनी माथेरानच्या विकासात ढवळाढवळ करू नये असे सुनावले आहे.
ढवळाढवळ मिंध्यांच्या अंगलट येणार
थोरवे यांनी आज महसूल विभागाचे माथेरान अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, पोलीस अधिकारी अनिल सोनोने, वनविभागाचे अधिकारी उमेश जंगम यांच्यासोबत माथेरान प्रवेशद्वार येथील दस्तुरी नाक्याची पाहणी केली. यावेळी थोरवे यांनी माथेरानच्या मीटरवर ई-रिक्षा पर्यटकांसाठी उपलब्ध राहील अशी घोषणा करून टाकली आहे. मात्र या परस्पर घेतलेल्या निर्णयामुळे वादाची ठिणगी पडणार असून