
मंत्रिपदांपासून पालकमंत्र्यांच्या आणि पीए, पीएसच्या नियुक्त्या, अजित पवार यांना मिळणारे झुकते माप अशा विविध कारणांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अस्वस्थ आहेत. अशा वातावरणातच मीरा-भाईंदरचे एक माजी पालिका आयुक्त क्रीम पोस्टिंगसाठी एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले आणि चांगल्या पोस्टिंगसाठी तगादा लावला. महायुतीतील राजकारणामुळे आधीच अस्वस्थ झालेल्या एकनाथ शिंदे यांची तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि त्यांनी या अधिकाऱयाला गेट आऊट सांगत केबिनमधून हाकलवून दिले, अशी जोरदार चर्चा सध्या मंत्रालयात रंगली आहे.
एकेकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळय़ातील ताईत असलेले मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी पालिका आयुक्त दिलीप ढोले हे एकनाथ शिंदे यांचे प्रिय अधिकारी होते. मात्र आजच्या प्रकरणामुळे चर्चांना उधाण आले आहे.