
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांच्या चौकशीचा सपाटाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला असून आज एकाच दिवशी शिंदे यांना दोन धक्के बसले. शिंदेंनी मंजूर केलेल्या जालन्यातील सिडकोच्या 900 कोटींच्या खरपुडी गृहनिर्माण प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत तर त्याचवेळी शिंदेच्या काळात देण्यात आलेले 1400 कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र आज महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे.
स्वच्छ कारभाराची सुरुवात शिंदे यांच्या निर्णयांच्या चौकशीनेच करा – वडेट्टीवार
एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्याची चौकशी फडणवीस करत आहेत. सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला, त्याची सुरुवात शिंदे यांच्या निर्णयांच्या चौकशीपासून झाली आहे, असे कॉंग्रेस विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.