सगेसोयरे अंतिम अधिसूचनेला चार महिन्यांचा अवकाश

 

मराठा कुणबी आरक्षणातील सगेसोयऱयांच्या व्याख्येसंदर्भात येत्या चार महिन्यांत यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल व अंतिम अधिसूचना जारी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री म्हणाले, सगेसोयऱयांच्या संदर्भात प्रसिद्ध  झालेल्या अधिसूचनेवर 8 लाख 47 हजार एवढय़ा हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. आतापर्यंत 4 लाख 47 हजार हरकतींची नोंद व छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित 4 लाख 47 हजार हरकतींची नोंदणी व छाननी करण्यासाठी साधारणतः 25 ते 30 दिवसांचा कालावधी लागेल. अधिसूचनेचा मसुदा अंतिम करून विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.